Saturday, 3 October 2015

पुलंची कलावंदना आणि जगणे

"आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो . उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाच शिक्षण जरूर घ्या . पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा , पण एवढ्यावरच थांबू नका . साहित्य ,चित्र , संगीत , नाट्य , शिल्प , खेळ ह्यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा . पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल . " पु . ल . देशपांडे 




कोठून जोपासू 
पुलंची कलावंदना  
रिकाम्या पोटा 
शब्द जंजाळ झाले 

भरल्या पोटा 
शब्द सुस्तावलेले 
कोरड्या डोळ्यांचे 
असह्य निखारे झाले 

कशी लेऊ कला 
उरणेच सल झाले  
हा महागडा अलंकार 
जगणेच जड झाले 


द्यावा आकाशाने ओलावा 
झिरपावी आभाळमाया 
त्याचे बरसणे नितळ 
माझे कलाविष्कार झाले 


काले वाचू संतगाथा 
संतशब्द साहित्य झाले 
लेकुराचे हसणे  गोजिरवाणे 
तेच मज सुधा झाले 


No comments:

Post a Comment