Thursday, 1 October 2015

शिस्त , स्वच्छता

          आपला देश अध्यात्माने इतका भारावलेला असताना , शिस्त आणि स्वच्छता याच इतका वावड का ? अध्यात्म हा आत्मशुद्धीचा मार्ग आहे मग बाह्य शुद्धीच काय? अध्यात्म काय फक्त आत्ममग्न होऊन स्वानंद मिळवण्याचा मार्ग आहे? आत्ममग्न होताना बाह्यजगताशी पूर्ण फारकत घ्यायची . किमान स्वछता,  शिस्त याकडे इतक दुर्लक्ष करायचं की , न्यायालयाला हस्तस्क्षेप करावा लागावा. अनेक पिढ्या याबाबत संस्कार , विचार झाला  नसल्यामुळे या छोट्या पण महत्वाच्या गोष्टी अंगी मुरवणे  सुरवातीला कठीणच आहे . 

       इतिहासात डोकावला तर शिस्त , स्वच्छता यावर फारशी चर्चा दिसून येत नाही . संत प्रवचन भरपूर आहेत . बहुतांश परमार्थाचा विचार करणारी . बाहेर पाहिलं तर शिस्तीचा , स्वच्छतेचा फारसा परिणाम समाजात जाणवत नाही . गाडगे महाराजांच्या उपयुक्त विचारांना दुर्लक्षित करण्यात आला आहे . ज्या विचारांना जवळ करण्यात आला आहे त्यातूनही  शिस्त , स्वच्छता याचा अभाव दिसून येतो . लोकांना  स्वत:हून याची जाणीव होणार नसेल तर .

           जगा आणि जगू द्या एवढ जीवनाच सोप तत्वज्ञान   असताना  शब्दांच्या महापुरात जीवनाचे  सत्वच वाहून गेले आहे . जगू देण्यासाठी शिस्त अंगी भिनवने  आवश्यक आहे . भिनवने यासाठी की , याची कधी सवयच लावली गेली नाही आपल्याला . किती आक्रमक पद्धतीने बोलतो , वागतो आपण . नम्रता हा दुबळेपण निदर्शक वाटत असल्यामुळे किवा त्यामुळे आपली संधी हिरावून घेतली जाईल या असुरक्षिततेमुळे कायम वरचढ (dominating )  अविर्भावात असतो . त्यावेळी कुणाची संधी हिरावली जातेय , सुप्त असंतोष होतोय याची जराही तमा बाळगली जात नाही . किती विद्रूप दिसतो आपण या अविर्भावात . who cares . रांगेत गाढवासारखी घुसणारी माणस (गाढवाला का बदनाम करण्यात येत हे कळत नाही . हा तर खूप शांत प्राणी आहे ). रस्त्यावर कर्कश आवाजात बोलणारे घोळके, लाल सिग्नलला बेमुवर्तखोरपणे टाटा करत जाणारी निष्काळजी , बेशिस्त माणस हे सर्व पाहून उगीचत अस्वस्थ व्हायला होत . स्वप्न आणि   वस्तुस्थिती  यातील अंतर  म्हणजे  शिस्त , हे खर वाटत . 

        वेळेच्या बाबतीत तर आपण गृहीतच धरलय. जी वेळ सांगितली आहे त्यापेक्षा उशीरा जायचं . हे भारतीय सर्वमान्य प्रमाणक  आहे .   नाटक बघताना याची प्रचिती येते . इतरही वेळी ती येतच असते . समजा नाटक ४ वाजता आहे  अन पुरेशे प्रेक्षक नसले, घड्याळ लावा .  नाटक सुरु झाल तरी प्रेक्षक येताच असतात . spiderman या सिनेमात पाहिलं  होत .  नायिका एका नाटकात काम करत असते . तिच्या प्रियकराला प्रयोगाला यायला उशीर होतो . त्याला नम्रपणे आत जाण्यास नकार दिला जातो . हे चित्र पहावयास मिळेल का ? 

       जिथे शिस्तच नाही तिथे स्वच्छतेबद्दल काय बोलावे .  ट्रेनच्या डब्यात, रस्त्यावर सहजपणे  कचरा करणारी माणसे आणि सामना हरल्यानंतरही स्टेडीयम मध्ये केलेला कचरा शांतपणे स्वत: उचलणारी जपानी माणसे . किती फरक . नेमका कोणता फरक आहे . आपली संस्कृती प्राचीन आहे . मग का घडते हे अस.  सभोवतालचा बकालपणा पाहताना त्याचे नकळत नकारात्मक परिणाम होतच असतात . काळवंडलेले परिसर , उन्हाची चकाकी घेऊन धावणार काळ पाणी , विस्कटलेली माणस .  सुन्न होत सर्व पाहून .




No comments:

Post a Comment