धुक येत नेमक
तुझ्याच वाटेवर
मनाला दाट करत
तुझ्या आठवणींना
धुक येत नेमक
खूप गुंता करून
गुंता सोडवताना
तुला आळवताना
धुक येत नेमक
मृगजळात पाहताना
मृगजळातून उसवताना
तुला कवेत घेताना
धुक येत नेमक
अंधाऱ्या रात्रीला
चांदण्याच्या प्रकाशात
तुला शोधताना
धुक येत नेमक
भास पेलताना
भासातून दीर्घ
श्वास सोडताना
धुक येत नेमक
सांडून अश्रूमाळ
ओंजळीतल्या दवात
चिंब भिजताना
No comments:
Post a Comment