Monday, 26 October 2015

प्रेमाने पोट भरत नाही

          सुकन्या एक गोड मुलगी . काही व्यक्तींबद्दल नेहमीच एक गुड फील वाटत तशी . हसतमुख , खळखळणारी . दु:ख  म्हणजे काय हा प्रश्न दु:खाला पडावा इतक सुख नेहमीच तिच्या चेहऱ्यात सामावलेले . वयाच्या त्या बेसावध वाटेवर ती प्रेमात पडली . नंतर भेटण नाही झाल .

              बऱ्याच काळानंतर सुकन्यासारखी एक मुलगी समोरून येताना दिसत होती . म्हणजे दिसत होती तिच्यासारखी पण चेहऱ्यावरचा सुखाचा ओलावा दिसत नव्हता . कोरडा चेहरा . ओळखीचा तरी अनोळखी . तिनेच हाक मारली . अरे सुकन्याच होती ती . खूप भरून आले . जवळच्या उपहारगृहात गेलो . निवांत बोलाव म्हणून . काय बोलावे ? कशी सुरवात करावी ? याचे आडाखे मनात बांधू लागलो . ती व्यक्त होण्याची  जणु वाट पाहत होती . कोसळली धबधब्यासारखी . 

                 " तुम्ही सगळे सांगत होता ते बरोबर होत . शिक्षण , करिअर याकडे आधी लक्ष द्यायला हव होत. काळाच्या ओघात उलगडणार प्रेम अनुभवेपर्यन्त संयम ठेवायला हवा होता . समुद्रकिनाऱ्यावरच्या चार भेटींनी माणसाची आणि आयुष्याची व्याप्ती नाही लक्षात येत . सगळे चांगल्या भावनेने समजावत होते. कळलच नाही . त्याचा पझेशिव  स्वभाव आवडायचा त्यावेळी .  प्रेमाचा कैफ होता . तो कैफ उतरला या वळांनी . मनावर खोल जखमा झाल्यात त्या वेगळ्या . बंधनात अडकायला मीच अधीर झाले होते , काहीच विचार न करता . माझ स्वतंत्र अस्तित्वच विरलय .  जगण्यासाठी शिक्षण , करिअर लागतच .  प्रेमाच्या धुंदीत  आयुष्याला आवश्यक गोष्टींकडे   दुर्लक्ष झाल . अशा वळणावर काय करायचं मग . प्रेमाने पोट  भरत नाही .इतर गरजाही असतातच ." 
       

No comments:

Post a Comment