गावाकडच विश्व . सुंदर मोकळ . पाखराच्या किलबिलीटासह येणारी पहाट अन दिवेलागणीला उमटणारे भजनाचे लयबद्ध सूर याने वातावरण भारलेले असते . मोकळा श्वास घ्यायला मोकळे आकाश आणि जमीन भरपूर मात्र प्रश्न रूढी -परंपरेचा आला कि श्वास गुदमरून जातो . अनावश्यक कर्मकांड, वास्तवता याचा तर्कबद्ध विचार करायलाही कुणी तयार नसत .
श्यामच्या वडिलांचं नुकतच निधन झाल होत . त्याला त्यानंतरची कर्मकांड न करता गावाच्या शाळेसाठी काही करायचं होत .तुमच्या असल्या त्तर्कनिष्ठ विचारांना काही किंमत नसते . त्या शाळेच्या उभारणीत त्याच्या वडिलांचा मोठा हातभार होता . कमी शिकलेले पण मुल शिकावी अस त्यांना खूप वाटे . . गेलेल्या माणसांची आठवण काढणे चांगला विचार आहे . त्यांच्या आठवणीच्या निमित्ताने एखाद विधायक कार्य झाल तर कुणाला नको आहे .
श्याम त्याच्या नातेवाईकांना सांगण्याचा प्रयत्न करत होता . ऐकणार कोण ? रूढीचे बोळे कानात होते . त्याने स्पष्ट सांगितले तुम्हाला जे करायचं ते करा . त्याला अपेक्षित होते उत्तर . ठीक आहे आम्ही करू , निदान तू ये कार्यक्रमाला . त्यांना प्रथा सोडायच्या नव्हत्या. श्यामला सर्वांना उपयुक्त पाऊले टाकायची होती . विधी झाल्यानंतर आपले म्हणणे मांडायची प्रथा असते . श्याम उभा राहिला .
" माझा बाप कमी शिकलेला . मुलांनी शिकावं हीच त्याची आवड . तो असताना त्याची आवड जोपासायला कुणी मदत केली नाही . विरोधाच झाला . आज सगळे चांगल बोललात . तुमचे कर्तव्य पार पाडलेत . शिक्षणातून विकास हाच त्यांचा उद्देश होता . परंतु तुमची कर्मकांड विकासाच्या आड येऊ नयेत म्हणून तेव्हढ्यापुरत त्यांनी ते स्वीकारलं होत . मरण्याअगोदर त्यांनी सांगितलं होत . हे काही करू नको . मुलांसाठी काही कर . जे गेले ते गेले . जे आहेत त्यांच्याकडे लक्ष दे . त्यांना आठवायचे असेल तर चांगल्या कामातून आठव . आपले चांगलेपण माणसे हयात असताना कामी का येत नाही ? त्यासाठी तेराव्याची वाट का पहावी लागते ? हे कळत नाही . या शाळेची पुढची जबाबदारी माझी ."
No comments:
Post a Comment