Wednesday, 28 October 2015

चेहरा



कोणता चेहरा माझा 
कोणते स्थान माझे 
हरवून का गेले 
गर्दीत भाव माझे 

का श्वास कोंडला 
घरच्याच गारद्यांनी 
वाट माझी अडखळली 
माझ्याच पावलांनी 

कशी वाट काढू 
कसे शोधू मला 
अंधाराला क्वचितच 
किनार चांदण्यांची 

जीव माझा जरी 
चार भिंतीत गुदमरला 
लोक काय म्हणुनी 
कौतुके म्हणती संस्कृती याला 

No comments:

Post a Comment