Thursday, 29 October 2015

स्टार

                संजय उत्तम संगणक तज्ञ . त्यामुळे चांगली मागणी . एक दिवस एका मोठ्या कलावंताकडे संगणक दुरुस्त करावयाचा होता .  हल्ली तो त्याच्या  सहाय्यकांनाच पाठवायचा . त्याला त्या कलावंताला भेटायची संधी सोडायची नव्हती म्हणून स्व:ताच निघाला .   
               एका छोट्या विश्वातून आज तो वेगळ्या वातावरणात प्रवेश करत होता . सगळ कस चकचकीत . अस पाहण्याची सवय नसल्यामुळे  बावरला होता . वेगळ्या वातावरणात उगाचच एक न्यूनगंड येतो त्याप्रमाणे .  स्टारच्या  पीएने त्याला संगणक दाखविला , त्याचा प्रॉब्लेम  सांगितला . प्रॉब्लेम फार काही मोठा नव्हता . काहीतरी करतो आहे अस दाखविण्यासाठी म्हणून तो उगाचच  वेळ व्यय करत  होता . सर्व ओके  झाल . पीएने त्याची फी विचारली . त्याने ३००० झाले म्हणून सांगितले . पीए घासाघीस करू लागला . इतक्यात तो कलावंत नेमका उगवला . त्याने त्यांचे संभाषण ऐकले होते. त्याने पीएला सांगितले , " बार्गैन नही . हमारा काम हुआ है  तो फीस दे दिजीये . चाय -नाश्ते  के लिये पुछा कि नही " 
              संजय तो किस्सा त्याच्या मित्राला सांगत होता , " अरे फार मोठा प्रोब्लेम नव्हता . १० रुपयाचा ही पार्ट नव्हता . या स्टार लोकांना काही कळत नाही . "
               त्याच्या मित्राने शांतपणे ऐकल . तो हसला क्षणभर थांबून म्हणाला , "  त्याला कशाला कळायला हव  . ते नाही गुंतून राहत अशा छोट्या गोष्टीत .  तुला १० च्या ऐवजी ३००० रुपये मिळाल्याचे समाधान आहे . ते खोट समाधान आहे  कारण   जास्त पैसे घेतले याची बोचही मनात असणारच तुझ्या . आपण छोट्या गोष्टीत किती अडकून राहतो नाही .त्यामुळे मोठ्या गोष्टींचा,  निखळ आनंदाचा विचार करतच  नाही .त्यांच लक्ष आकाशाकडे असते . ते त्यात पूर्णपणे एकरूप झालेले असतात म्हणून ते स्टार असतात . "

No comments:

Post a Comment