Monday, 1 February 2016

व्यवहार

            शांताराम कनिष्ठ मध्यमवर्गीय माणूस . चार मुलीच . वंशाला दिवा हवा या पारंपारिक दबावातून प्रयत्न सुरूच . मुलं झाली परंतु   वाढलेल्या पसाऱ्याने संसाराची  घडी विस्कटली होती . आता फार उशीर झाला होता . रेटणं एवढचं हातात होत. 
           चार मुलीतील एक मुलगी संवेदनशील ,  तिला परिस्थितीची आणि व्यवहाराची जाण होती . आई -बाबा यांची होणारी ओढाताण ती जवळून पाहत होती . मार्ग शोधत होती .  एका सकाळी बाप मुलीला उठवत होता . तशी लवकर उठायची . घरातल्या कामाला लागायची . शरीर थंड . निपचित . क्षणभर चरकलाच तो . तिच्या मुठीत कागद दिसत होता . कापऱ्या  हाताने  तो वाचू लागला . 
          "प्रिय , आई-बाबा . तुमची ओढाताण मी पाहतेय . मुलगा हवा म्हणून घराचा पसारा तुम्ही वाढवला . व्यवहार ज्ञानाकडे पूर्ण दुर्लक्ष केलत तुम्ही . कधी विचार केलात . श्रीमंत माणसे कित्येक पिढ्या सहज पोसू शकतात , मग त्यांना नेमकीच मुले का ? तुम्ही   स्वतःहून गरिबी का ओढवून घेतलीत ? एकाच संगोपन तुम्ही व्यवस्थित करू शकला असता . एकाच्या सुखाचे इतके वाटे केलेत की , दुसऱ्याच्या वाट्याला तस काही उरलच नव्हत . का तुम्हाला मुलाचा हव्यास . मुली म्हणून कुठे कमी पडलो असतो आम्ही . आपल्या घरातली परिस्थिती म्हणजे जगण्याची शिक्षा आणि तुम्हाला भार  आहे . माफ करा मला "   

No comments:

Post a Comment