Wednesday, 3 February 2016

खड्डे



रस्त्यावरील खड्डे  निर्जीव,   असंवेदनशील ,
त्या माणूस नावाच्या प्राण्यासारखे
 त्यांनाही लागतो बळी
भावना चेतवायला ,  पहुडलेल्या अजगरांना जागवायला

 जागवायचं कसं  जाणीवेने  बोथट कुंभकर्णांना   ,
त्यांच्या  निलाजऱ्या कोषातून ,
उतरायचं कसं कातळ मनात ,
संवेदना रुजवायला , माणुसकी फुलवायला….

कधी पोचेल कृष्णविवरात  आशेचा किरण?
आपणच व्हाव मार्गस्थ  जपत ,
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन,
आपलच कुणी  गमावल्याची जाणीव होत नाही तोपर्यंत…

No comments:

Post a Comment