Thursday, 4 February 2016

Valentine - प्रेमकिडा

प्रेमाचा किडा 
सर्वांगात भुणभुणतोय 
नकार सारे पचवून 
तुझेच गीत गुणगुणतोय 
        -------

सप्तपदी तर
एक संस्कार आहे
प्रेमाच्या बंधाला
तुझाच तर  आधार आहे
        -------


प्रेम अस होत नाही
गंमत म्हणून
ते रुजत मनात
अनाहूत होऊन
            -------


तुला हृदयापासून
तोडण कधी  जमलच नाही
घाव होते मनात तरीही
जगण  तुझ्याशिवाय   जमलचं नाही
           -------

नि:शब्द गीत तुझ्या
मनात रुजावे
न बोलताही काही
नकळत बंध जुळावे
          -------

जगण  म्हटलं तर
जगण आहे...
तुझ्याशिवाय खर तर ते
माझ मलाच रेटण आहे .

              -------


तुझ नसण जाणवतंय
तू नसताना
खंत एकच आहे
नाही गुंतलो  तू असताना

               -------


पाखरे सकाळी गाऊन गेली
तुझ्या हृदयातील गाणे
सोडून मागे गीत मनाचे
करून धुंद तराणे


                 -------

अस नाही तुझा
राग येत नाही
तुझ्या शिवाय पण
गोडवाही  येत नाही

                 -------

गायचे होते तुझ्यासवे
तेच गीत  पुराने
अश्रूंसह वाहून गेले
हृदयातील सूर दीवाने

              -------

खर सांगतो तुझ्यासवे
वेळ अणू भासते
कधी नव्हे ती सापेक्षता
आईनस्टाइनची कळू लागते

                -------
मागे वळून पाहताना
डोळे  ओलावले होते
धूसर तुझे दिशाहिन जाणे
हृदयात बोचले होते

             -------

कधी एकटी असता
तुला वाटत का ग
अनपेक्षित मी याव
अन तुला छेडाव

              -------

तुला आठवत का ग
तुझ तुझ्यातच रमणे
मला दुर्लक्षून , त्या फुलाला
ओंजळीत गोंजारणे


             -------

त्या बेटावर पाऊलखुणा
तुझ्या शोधत होतो
निसटत होते  संदर्भ सारे
लाटांनी अश्रू पुसत होतो

             -------

खरच सांगतो तू गेलीस तेव्हा
डोळ्यात पाणी  नव्हत…
माझ अस काही उरल नव्हत
आभाळच माझ्यासाठी रडत होत

            -------

तू प्रतिसाद न देता गेलीस
म्हणून रडलो नाही
घाव होते मनात तरीही
साद घालणे थांबल नाही

             -------

का गेलीस अशी
न सांगता तोडून
उगा कडवट भाव
जहरी असे सोडून

            -------

मनात एक धबधबा आहे
अव्यक्त भावनांचा
 आसुसलाय चिंब करण्यासाठी
तुला , काही न बोलता

           -------

मनात ते घर
तुझ्यासवे गुंफलेले
नकळत तुझ्या ,
मनातच शिंपलेले
         -------

तू जाणारच आहेस
तर कशाला भेटायचं
एकांतात अश्रूंनी
एकट का सोसायचं

             -------

नात जपायचं नाही
तर का येतेस माघारी
उगाच खोट्या आशेला
का देतेस उभारी 

          -------

स्वत:त हरवून  तुला मी
दुर्लक्षीतो अस नाही
खोल  अशी  तूच तर असतेस
तुझ्या धुंद विभ्रमासह


             -------

खोटे खोटे रुसणे
निष्पाप  तुझे  बहाणे
तुझ्याशिवाय आता
स्मृतीत जपणे

          -------

का गेलीस अशी
न सांगता तोडून
उगा कडवट भाव
जहरी असे सोडून

          -------


No comments:

Post a Comment