Wednesday, 10 February 2016

डॉ.जगदीशचंद्र बोस आणि पालक

       वैदिक काळापासून शास्त्रज्ञांचा आढावा घेतला तर भौतिक पातळीवर वस्तुनिष्ठ अभ्यासाच्या आधारे संशोधनात्मक  सत्य समोर आणण्याचा प्रयत्न  अभावानेच झाल्याचे दिसून येते .  त्यामुळे आपल्या देशात पूर्वीपासून संशोधकांची वानवा होती . ब्रिटीश आल्यानंतर पाश्चात्य अभ्यासपद्धतीशी आपला परिचय होऊ लागला त्यानंतर अनेक शास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय स्तरावर उदयास येऊ लागलेकुठे होती ही मंडळीइथेच होतीफक्त ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्यावर सत्याचा शोध वस्तुनिष्ठ पध्दतीने घ्यायची सवय लागल्यावर अनेक बुध्दीमान व्यक्तीमत्वांचा परिचय होऊ लागला

      असे एक व्यक्तीमत्व म्हणजे डॉ.जगदीशचंद्र बोस. त्यांचे वडील सरकारी अधिकारी होते.  नोकरदार माणसांचा दृष्टीकोन, मर्यादित परिघात वावरत असल्यामुळे संकुचित  होतेा  त्या काळापर्यंत भौतिक अभ्यासाकडे  भारतीयांचा ओढा नव्हता .  त्यांचे वडिलांनी  त्यांना योग्य दिशा दिली

         बोस यांना लहानपणापासून निरीक्षणाची आवड होती . संशोधकांचा हा मुलभूत गुण आहे . त्यांच्या पुढील संशोधनाची मुळे त्याच्या बालपणातच रुजली होती . त्याला  दूरदृष्टीने खतपाणी घालण्याचे काम त्यांच्या वडिलांनी वेळीच केले . पालकांचे त्यांच्या मुलांवरील बालपणी केलेले संस्कार पुढील आयुष्यात दिशादर्शक ठरतात .  

         बोस यांचा यांचा जन्म बंगालमधील राणीखल या गावी ३० नोव्हेंबर १८5८ रोजी झाला .  बोस यांची प्रश्न विचारण्याच्या सवयीला त्यांच्या वडिलांनी कधीच मोडता घातला नाही . त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ते देऊ  नसल्यास पुस्तके वाचून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे  प्रयत्न करत . हे पालकांनी लक्षात घेण्यासारखे आहे . मुलांची जिज्ञासावृत्ती वाढवण्यासाठी  त्यांना सतत उत्तेजन देणे आवश्यक आहे . बोस यांच्या वडिलांचा त्यांनी मातृभाषेतून शिक्षण घ्यावे असा आग्रह होता . कारण मातृभाषेतून विषयाचे आकलन होणे सुलभ असते . त्यावेळी इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे प्रतिष्ठेचे मानले जाई. आताही ही परिस्थिती फारशी बदललेली नाही . पालकांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा पाया मातृभाषेतून घालण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत

           
बोस यांचे पदवी शिक्षण st xavier  college , Calcutta येथे झाले . त्यानंतर medicine च्या अभ्यासासाठी ते लंडन येथे गेले . वडिलांची इच्छा म्हणून त्यांनी हा विषय घेतला होता . परंतु त्यांचे मन भौतिकशास्त्र , वन्सपातीशास्त्र या अन्य शास्त्रात रमत असल्यामुळे त्यांनी आपले लक्ष त्या विषयावर केंद्रित केले . पालकांनी हि गोष्ट विशेषकरून लक्षात ठेवण्यासारखी आहे . आपल्या मुलांवर आपल्या इच्छा लादू नका . त्यांना त्यांच्या  विषयात काम करू द्या .

              बोस हे फक्त संशोधक नव्हते तर तंत्रज्ञही होते .  wireless तंत्राचे संशोधन बोस यांनी केले असले तरीही त्याचे पेटंट मार्कोनी याने घेतल्यामुळे याचे  श्रेय त्याला जाते . बोस हे संन्यस्त वृत्तीचे वैज्ञानिक होते .  मार्कोनीचा काळ १८७४ ते १९३७  यांच्या समकालीन असा आहे .   coherer - विद्युत लहरी मोजण्याचे यंत्र , artificial retina  जो फोटोग्राफी साठी खूप महत्वाचा आहे , याचेही संशोधन त्यांनी केले

             
वनस्पतींना भावना असतात , त्या सचेतन असतात .  हा तात्विक , अलंकारिक विचार वाटला तरी भौतिक कसोट्यावर  त्यांनी सिद्ध करून दाखविला हा  वैशिष्ट्यपूर्ण शोध महत्वाचा आहे . ही संकल्पना त्या काळी क्रांतिकारी होती . त्यातूनच crescograph  हे वनस्पतीची वाढ मोजण्याचे यंत्र त्यांनी विकसित केले . कृषी शास्त्रात , वनस्पतीची वाढ होण्यासाठी कोणते घटक पोषक ठरू शकतात या दृष्टीने हे संशोधन सर्वांसाठी उपकारक आहे ते polymath  म्हणजे अनेक विषयाचे ज्ञान असलेले,  असे होते . अशा या थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू १९३७ साली झाला . 




          

No comments:

Post a Comment