प्रभात वारा यावा
हळूच सांगण्यास गुज
तुला न ठावे पेच
हे स्वप्न जीवनास
स्तब्ध वेळी तू
यावे अनपेक्षित
नि:शब्द जगात माझ्या
मधुर गीत गाण्यास
कसे कळावे तुला
माझ्या मनीचे गीत
मेघांनीही केली गर्दी
आसवे गाळण्यास
बरसू दे धारा
अव्यक्त भावनांच्या
वैराण जीवनास माझ्या
चिंब चिंब करण्यास
हळूच सांगण्यास गुज
तुला न ठावे पेच
हे स्वप्न जीवनास
स्तब्ध वेळी तू
यावे अनपेक्षित
नि:शब्द जगात माझ्या
मधुर गीत गाण्यास
कसे कळावे तुला
माझ्या मनीचे गीत
मेघांनीही केली गर्दी
आसवे गाळण्यास
बरसू दे धारा
अव्यक्त भावनांच्या
वैराण जीवनास माझ्या
चिंब चिंब करण्यास
No comments:
Post a Comment