Tuesday, 8 March 2016

आफ्टर -लगीन

           


        नवरा -बायको अन त्यांच्या समस्या हे नाट्यमंचाच्या छोट्या अवकाशात मावणारं लेखकाचं /दिग्दर्शकांच आवडत कथासूत्र आहे . गंभीर, रहस्यमय , हलक्याफुलक्या सादरीकरणातून कथा पुढे सरकते . काहीवेळा त्याला मानसशास्त्राची जोड दिली जाते . अशा सादरीकरणात किमान तीन पात्रांची आवश्यकता असते . दोन मुख्य व एक कथासूत्र पुढं ढकलणारं. सर्वच पात्रं रंगमंचावर असण्याची आवश्यकता नाही . उदा . "ग्रेसफुल " हे नाटक . वावरणारी दोनच पात्रं .तिसर पात्र जे कथेचा कार्यकारणभाव आहे परंतु फक्त संवादातून उलगडत . नवरा -बायकोची कथा वेगवेगळ्या perspective  ने अनेकवेळा सादर झाली आहे . 

     आफ्टर -लगीन या नाटकातील भूषण -श्वेता या सुखी जोडप्याची, निर्मलामुळे (भूषणची स्वीय -सहायक ) निर्माण झालेल्या गैरसमजातून विनोदी अंगाने कथा पुढे सरकते . कथेला पुढे नेण्याचे काम निवेदक (भूषणाचा मित्र ) करतो . नाटकाची कथा वेगवेगळ्या प्रसंगातून फुलविण्यात आली आहे . स्त्री -पुरुष मानसिकतेचा शोध घेण्याचा प्रयत्न नाटक करत . सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरातून जे नवरा-बायको संबंधाच चित्र दिसत , त्याचच प्रतिबिंब नाटकात पहायला मिळत .  

No comments:

Post a Comment