Saturday, 5 March 2016

क्षितीज

ते बेट , समुद्र तू अन मी
उरलंय  फक्त अनंत  क्षितीज
न संपणार डोळ्यांना खुपणारं
स्मृतीच्या आवर्तनात विरघळणारं

दोन थेंब ओघळतात नकळत
समुद्राच्या बेहोष लाटांत
हुंदकेही लुप्त होतात
त्याच्या  उत्स्फूर्त गाजात

त्याच्या बेहोशीला अर्थ आहे
नदीच्या आश्वस्त  मिलनाचा
माझ काय . . सोबतीला क्षितीज
अनंत  क्षितीज. . .  अनंतापर्यंत

No comments:

Post a Comment