Friday, 4 March 2016

गझल :कळूनही सर्व

कळूनही सर्व आत जळत होतो मी
तुझ्याविन  का असा गळत होतो मी.
निर्दयी नकार पचवून तुझे सारे
का उगा पाठी वळत होतो मी.

  वचन न भेटण्याचे माझेच मला जरी
शब्दांपासून माझ्याच  का ढळत होतो मी.

मृगजळ तू जीवनात   ज्ञात   मला जरी
का स्वत:लाच असा छळत होतो मी.


No comments:

Post a Comment