मुलगा देखणा , उच्च शिक्षित . मुलगी सुंदर ,साधी . अन्य सर्व गोष्टी पत्रिकेनुसार . बाप धन्य झाला . त्याच्या माथ्यावरच परंपरेच ओझं उतरलं . मुलगी परक्याच धन म्हणून उरकून टाकल लग्न अन मोकळा झाला बापडा .
मुलीला भविष्यात काय वाढून ठेवलय याची कल्पना नव्हती . भविष्याच्या रम्य स्वप्नात गुंतून गेली होती बिचारी . हळूहळू सत्य उघड होऊ लागल तसं तिच्या आयुष्याला एक संथपणा , विस्कळीतपणा येऊ लागला . सत्य तिला समजल आहे हे सासू -सासऱ्यांना कळल्यानंतर त्रास अधिकच वाढू लागला .सहन करण्यापलीकडे . कस सांगाव घरच्यांना ? सत्य वास्तवापेक्षा भयानक होते . शेवटी धीर एकवटून तिने घरच्यांना एक चिठ्ठी लिहिली .
" मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कल्पनेपेक्षा भयानक आहे . तुम्हाला त्रास द्यायचा हेतू नाही . सहनच होत नाही . हे मृदुभाषी , सुंदर म्हणून सगळ्यांना कौतुक . वास्तव कल्पनेपेक्षा वेगळ असू शकत . त्यांना स्त्रिया आवडत नाहीत . म्हणजे . . . तुम्हाला समजलंच असेल . मुलगा त्यातला आहे हे उघड होऊ नये म्हणून मला कोंडून ठेवण्यात आल आहे . समाजाला त्याच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी इतरांच्या भावनांशी, वास्तवाशी काही घेणं- देणं नसतं . त्यासाठी माझा छळ चाललाय . तुम्ही म्हणाल मुलीच्या जातीला हे सोसावच लागत . माझी मानसिक , शारीरिक कुचंबणा कशी सांगू ? कस निभवायचं हे तकलादू नात अन किती काळ ? हे भयाण वास्तव मी स्वीकारू की स्वतंत्र होऊ तुम्हीच सांगा . "

No comments:
Post a Comment