Monday, 29 February 2016

मुखवटा ओढलेली माणसे


निशब्द असूनही टोचणारी
अंध असूनही जाळणारी
 मुखवटा ओढलेली माणसे

ययातीच अंतरंग असलेली
भोगात गुरफटलेली
मुखवटा ओढलेली माणसे

निखळ आनंदास  मुकलेली
चौफेर सुख  ओरबाडणारी
मुखवटा ओढलेली माणसे

शांत दिसूनही अशांत करणारी
आपल्याच कोषात फसलेली
मुखवटा ओढलेली माणसे 

No comments:

Post a Comment