Monday, 21 March 2016

"ओळख "

प्रत्येकाला हवी असते एक "ओळख "
"ओळख " समाजाची ,
"ओळख "  आत्मानंदासाठी
परिघाबाहेर असतंं आसक्त मन
दुसऱ्याच्या नजरेतून गोंजारविण्यासाठी

अंतर्नाद म्हणून हवी "ओळख "
नशा म्हणून हवी  "ओळख "
अनोळखेपण  कधी जाळते "ओळख "
मृगजळात या   "ओळखीच्या "
हरवते स्वतःची स्वतःशी "ओळख "

No comments:

Post a Comment