Saturday, 19 March 2016

हिंस्त्र श्वापदे

वावरतायतंं हिंस्त्र  श्वापदे
लेऊन विखारी कटू भाव
अशांत करीत शांत समुद्राला
उद्दीपीती  भावनांच्या कल्लोळाला

सृजनात रमलेल्या छोट्या जगाला
का अधीर विवरात ओढायाला
का उधाण यांच्या वावटळीला
अघोरी भावनांच्या फुत्काराला

या फुत्कारांनी वैराण नंदनवन
हरवून बसले चैतन्य मनोमन
का जगन्नियंता ही मौन
तराजू त्याचा नाही समान

No comments:

Post a Comment