Wednesday, 30 March 2016

विक्रम, मोहिनी, राजवाडे


               
           विक्रम, मोहिनी, राजवाडे या नावात तीन पात्र आहेत.  त्याप्रमाणे नाटकात विक्रम आणि मोहिनी  पती-पत्नी व राजवाडे हे प्रत्यक्ष रंगमंचावर न येणारं रहस्यमय पात्र आहे .  मोहिनी वयाने मोठी,  महत्वाकांक्षी विक्रमवर मनापासून प्रेम करणारी. संसारातली आर्थिक जबाबदारी सांभाळणारी. तिच्या आई-वडिलांचे निधन झाल्यावर राजवाडे तिचे पालकत्व स्वीकारतात.  त्या बदल्यात त्यांची आसुरी इच्छा तिला अनिच्छेने पूर्ण करणं भाग पडत असतं. लग्नानंतरही हे दृष्टचक्र संपत नाही. विक्रमला राजवाडे बद्दल आपुलकी नसते किंबहुना संशय असतो. लग्नाच्या पहिल्या रात्री मोहिनीला आलेल्या नाईटी गाऊनच्या प्रेंझेटने तणावाला सुरुवात होते . वाद-विवादतून वस्तुस्थिती उलगडत जाते. या तणावातून पुढे काही तरी अघटित घडणार आहे. याची कल्पना येते अन् राजवाडे यांचा खून होतो. हा खून का होतो आणि कोण करत हे यातल रहस्य आहे. रहस्यमय वळणं घेत नाटक एका अनपेक्षीत टप्प्यावर पोचत? हा टप्पा काय यासाठी नाटक पहाव लागेल.





No comments:

Post a Comment