Wednesday, 23 March 2016

गीत हरवले

स्पर्श मनाला
आभास धुक्याचा
स्पंदने भारली
उमगेना किनारा

गुंतला जीव
चांदण्यात वेडा
रातराणी मोहरली
हृदयात माझ्या

स्वप्न मखमली
तुझ्यासवे पाहिले
गीत जे प्रेमाचे
तुझ्यासवे गाईले

उरले ना सूर
गीत हरवले
घन उतरले
डोळ्यात माझ्या 

No comments:

Post a Comment