गझल :जगणे
आपल्यांच्या अपेक्षांत दबून गेलोय मी
स्व:त्व नकळत अर्पण करून गेलोय मी
माझे असावे असे माझे काही नाही
का उगा याला माझे जग समजून गेलोय मी
माझे असे जगणे केव्हाचे ताटकळले
जगण्याचे संदर्भ माझे विसरून गेलोय मी
स्वार्थ प्रत्येकाचा दिसे केविलवाणा
निरपेक्ष प्रेम तयांचे निसटून गेलोय मी
तलम धागे जगण्याचे एकमेकात विणलेले
जगणे माझे उसवण्याचे विसरून गेलोय मी
आपल्यांच्या अपेक्षांत दबून गेलोय मी
स्व:त्व नकळत अर्पण करून गेलोय मी
माझे असावे असे माझे काही नाही
का उगा याला माझे जग समजून गेलोय मी
माझे असे जगणे केव्हाचे ताटकळले
जगण्याचे संदर्भ माझे विसरून गेलोय मी
स्वार्थ प्रत्येकाचा दिसे केविलवाणा
निरपेक्ष प्रेम तयांचे निसटून गेलोय मी
तलम धागे जगण्याचे एकमेकात विणलेले
जगणे माझे उसवण्याचे विसरून गेलोय मी
No comments:
Post a Comment