कसे होईल व्यक्त , अव्यक्त हे मन
धुरकटले अवकाश , क्षितीज दिसेना
आवाज आतला , कृष्ण -विवर झाला
प्रकाशाची तिरीप , काळा डोह झाला
साद माझीच मला , ऐकू येईना येईना
गुरफटले मन भोवऱ्यात , निसटली साद
उंडारले माझे मन , वाटा धुसर झाल्या
झाले तुकडे तुकडे , सापडेना कवडसा
कसा तोडू पाश , पाहू पल्याड पल्याड
हिरव्या रानात रानात , निळ्या आकाशात
दे आभाळमाया , दे पावसाची साथ
व्हावे मन चिंब , अद्वैताच्या शोधात
धुरकटले अवकाश , क्षितीज दिसेना
आवाज आतला , कृष्ण -विवर झाला
प्रकाशाची तिरीप , काळा डोह झाला
साद माझीच मला , ऐकू येईना येईना
गुरफटले मन भोवऱ्यात , निसटली साद
उंडारले माझे मन , वाटा धुसर झाल्या
झाले तुकडे तुकडे , सापडेना कवडसा
कसा तोडू पाश , पाहू पल्याड पल्याड
हिरव्या रानात रानात , निळ्या आकाशात
दे आभाळमाया , दे पावसाची साथ
व्हावे मन चिंब , अद्वैताच्या शोधात
No comments:
Post a Comment