Monday, 11 April 2016

पडदा

आर्त जाणिवांचा
डोंब उसळला आहे
ठावे अंतर्मना तरी
पडदा ओढला आहे

उतरले रंग मुखी
कोरडा भाव आहे
मनाशीच माझा
उभा डाव आहे

आस खोल मनात
तुलाच जपणे आहे
का उगा दुनियेपायी
स्वतःलाच कुरतडणे आहे


No comments:

Post a Comment