Tuesday, 12 April 2016

सर्किट हाऊस




               शासकीय वसतिगृहात (सर्किट हाऊस) घडणारा एक छोटासा प्रसंग.  या प्रसंगाभोवती पूर्ण फार्स रचण्यात आला आहे .  मंत्री वसतिगृहात विरोधी पक्षाच्या पी.ए. सोबत मजा करायला आलेले असतात. त्यांच्या मागावर असलेला जासूस खिडकीत अडकून बेशुध्द होतो. तो मेला आहे असे समजून मंत्री हादरतात आणि मदतीसाठी त्यांच्या पी.ए. ला बोलावतात. विरोधी पक्षातील  पी.च्या नवऱ्याचे ,  मंत्र्याच्या बायकोचे, मंत्र्यांच्या पी..च्या नर्सचे  आगमन नाटकात धमाल आणतात . मग एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात अशी घटनांची वेगवान मालिका सुरु होते. फार्स असल्यामुळे कथानक शोधण्याच्या भानगडीत पडू नका . 


           मेंदूला त्रास न देता, एखाद कथानक (कथानक म्हणण्यापेक्षा अचानक घडलेले  प्रसंग) पाहायच असेल तर कॉमेडी प्रकारातील No ends and means या प्रकारातील नाटक प्रकार पाहण वेगळाच अनुभव असतो. परंतु विनोदाचा सहजपणा,  घटनाक्रम चुकला तर नाटकाचा पुरता पुज्जा उडू शकतो. नाटक पाहत असताना नेमक आपण कशासाठी पाहतोय हा प्रश्न उपस्थित होतो.  विनोदी घटनांची एका पाठोपाठ एक मालिका सुरु होते  प्रेक्षक नाटकाचा अर्थ उकलण्याच्या भानगडीत न पडता हास्यकल्लोळात बुडून जातात .आपल्याला विचार करायला वेळ न देता ,  फार्सच्या अंगाने जाणारी कॉमेडी असल्यामुळे जास्त विचार न करता कॉमेडीचा आनंद घ्या.      

No comments:

Post a Comment