जग दोघांच स्वतःहून दोघांनी साकारलेलं .
… स्वतःहून स्वीकारलेलं .
आरंभ होता उत्कट… नेहमीसारखा
काळोखाला वावही नव्हता दोघांना भेदण्याइतका
हलकी होती मनं…. लहरत होते सूर
काल -प्रवाहात हळूहळू आकाश झाले भेसूर
उल्हासित करणाऱ्या भावना झाल्या खुळचट
वाद नाही …. संवाद होते पण धुसर .
दोघांनाही कळेनास झालं .
एक पोकळी भरून राहिली होती अवकाशात
भौतिक सुखाच्या आवरणात मनं घुसमटत होती
मनाची ओढ विखुरली होती ….
एकाच अवकाशात राहूनही दूरदूर झालेल्या ताऱ्यांसारखी ...
… स्वतःहून स्वीकारलेलं .
आरंभ होता उत्कट… नेहमीसारखा
काळोखाला वावही नव्हता दोघांना भेदण्याइतका
हलकी होती मनं…. लहरत होते सूर
काल -प्रवाहात हळूहळू आकाश झाले भेसूर
उल्हासित करणाऱ्या भावना झाल्या खुळचट
वाद नाही …. संवाद होते पण धुसर .
दोघांनाही कळेनास झालं .
एक पोकळी भरून राहिली होती अवकाशात
भौतिक सुखाच्या आवरणात मनं घुसमटत होती
मनाची ओढ विखुरली होती ….
एकाच अवकाशात राहूनही दूरदूर झालेल्या ताऱ्यांसारखी ...
No comments:
Post a Comment