Saturday, 30 July 2016

मैफल

कोंडले मन
मेघ घनदाट
उत्स्फूर्त फुटेना
कोमल तलम  वाट ...

अंतरीचा घाव
मिटेना जीवघेणा
आस ही विखारी
बंध रेशमी तुटेना

एकांत गोड
हा विभ्रम तुझा
एकल्या  सावल्यात
संपेना  शोध तुझा

मिटल्या पाकळ्या
 दाटली लाली
अंधारात आठवांची
मैफल थाटली ...

No comments:

Post a Comment