Monday, 9 May 2016

मन दव झाले

बेधुंद आसमंत मन दव झाले
ओघळले ओठाशी.... हळूच थबकले
कसे आवरू....   नभ भरून   आले
बेईमान ते ....  तुज सामील झाले

मिठीत घेऊन तुला कैद केले
नभाचे सागराशी मीलन झाले
ठावे मज भास हे सारे
डोळ्यातून नकळत दव पाझरले
बेधुंद आसमंत … मन दव झाले


का छळशी सखे  दूर राहून
 धावे मन   क्षितीजा पलीकडे
मृगजळ तू …आभास तू
कसे सांगू तुज …  शब्द धुके  झाले
बेधुंद आसमंत   … मन दव झाले



No comments:

Post a Comment