येत रडू …. शास्त्रीजींचा साधेपणा अन नेते म्हणवण्यारांचा उथळपणा पाहून …
येत रडू …. मदर टेरेसांच प्रेम अन प्रेमाच्या नावाने चाललेला बाजार पाहून …
येत रडू …. आधी संसार नेटका ची शिकवण देणाऱ्या अन "संत" म्हणवण्याऱ्यांनी मांडलेल्या उच्छादाला पाहून …
येत रडू …. दृष्टीआड केलेल्या रत्नांकडे अन कृत्रिम झळाळीकडे धावणाऱ्या लोकांकडे पाहून …
येत रडू … सोन्याचा धूर निघणाऱ्या देशाच अन आता काळवंडलेल्या अवकाशाला पाहून ….
येत रडू …. आमच्या हतबलतेकडे अन आमच्यासाठी घाव सोसणाऱ्या महापुरुषांकडे पाहून …
येत रडू …. रडणाऱ्या डोळ्यांकडे अन थिजलेल्या हातांकडे पाहून ……
No comments:
Post a Comment