Wednesday, 16 November 2016

क्षणभर


ओलावतील डोळे क्षणभर
जग विस्कटलेलं पाहून
बोचतील यातना क्षणभर
जगावेगळं जग पाहून

उरेल आवेग क्षणभर
स्वप्न उद्याचं पाहून
प्रवास बोचरा क्षणभर
जाईल क्षणात सरून

देईल मन क्षणभर
लाख दुआ आतून
खंत वाटेल क्षणभर
जगणे मखमली ओढून 

No comments:

Post a Comment