वेडं होऊन जगावं वाटतं
उधाण दर्यासारखं
लाथाडून खडकांना
झेपावं किनाऱ्यावर वाटतं
कोंडलेल्या भावनांना
मुक्त करून जगावं वाटतं
बेसूर या मैफिलीला
सप्तसुरांनी सजवावं वाटतं
जगण्याचा कसला हिशोब
क्षण क्षण जगावं वाटतं
आपल्याच नादात उन्मुक्त
रानमोळ भटकावं वाटतं
माझे कुठले जगणे
जे समाजाने लादले
समाजरूपी बेड्यांना
तोडून जग पाहावं वाटतं
उधाण दर्यासारखं
लाथाडून खडकांना
झेपावं किनाऱ्यावर वाटतं
कोंडलेल्या भावनांना
मुक्त करून जगावं वाटतं
बेसूर या मैफिलीला
सप्तसुरांनी सजवावं वाटतं
जगण्याचा कसला हिशोब
क्षण क्षण जगावं वाटतं
आपल्याच नादात उन्मुक्त
रानमोळ भटकावं वाटतं
माझे कुठले जगणे
जे समाजाने लादले
समाजरूपी बेड्यांना
तोडून जग पाहावं वाटतं
No comments:
Post a Comment