Thursday, 29 December 2016

छडा

     





        सुरेश जयराम यांच नाटक म्हणजे रहस्य, थरार, गुंतागुंत हे समीकरण ठरलेलं  आहे.  रंगमंचावर रहस्यकथा सादर करणे तसं  अवघडचं  आहे.  रंगमंचाच्या मर्यादीत अवकाशात कथेचे सूत्र प्रवाहीपणा , रंजकता उठावदारपणे सादर होऊ शकले नाही तर नाटक कंटाळवाणे होऊ शकते.  प्रेक्षकांची उत्सुकता शेवटच्या क्षणापर्यंत ताणून धरण्यात जर कथासूत्र यशस्वी ठरले तर ते नाटक अधिका रंजक होते.  या नाटकात ही रंजकता, थरार शेवटपर्यत टिकून  राहतो.  

            नाटकाचा नायक एक टी.व्ही.कलाकार आहे.  3 वर्ष नामनिर्देशन होऊनही त्याला पारितोषीक मिळालेले नाही.  यामुळे तो चिडलेला आहे .  त्याची बायको मानसिकदृष्ट्या खचलेली आहे. त्यांच्या हातून एक अपघात घडलेला आहे . त्या अपघातात सोनिया नावाची एक मुलगी मारली जाते . याबद्दल त्यांनी कुणालाही सांगितलेले नसतं . दोघां शिवाय याबद्दल कुणालाही माहित  नसताना  सोनियाच्या नावाने ब्लँक कॉल येणं सुरु झाल्यामुळे ते अस्वस्थ होतात .  

         तिच्या पतीचे एका डॉक्टरबरोबर, शेजारणीबरोबर  अफेर आहे.पतीच्या बाहेरख्याली स्वभावामुळे त्यांच्यात सारखी भांडणे होत असतात . परंतु त्याची पत्नी घटस्फोट देण्यास तयार नसल्यामुळें तो  डॉक्टरांच्या मदतीने तिचा काटा   काढण्याचा कट आखत आहे . 

          पारितोषीक न मिळाल्यामुळे नायक रागावलेला आहे. कार्यक्रमावरून आल्यानंतर   त्याचे आणि त्याच्या बायकोचे  भांडण सुरु होते. अतर्क्य गोष्टी सुरु होतात . मध्यांतर एका अशा टप्प्यावर येते जो नाटकाचा शेवट वाटतो . नेमकं पुढं काय घडतं , आपल्या तर्कांना छेद देत नाटक एका वेगळ्याच वळणावर पोहोचतं.  नेमकं काय होतो शेवट? यासाठी  हे नाटक पहावंच  लागेल . 



No comments:

Post a Comment