नाते विरले ,अश्रू सुखले
माझे न.. माझे उरले
मला अजून वाटते,
बरसेल दवबिंदूंची माळ
मला अजून वाटते,
काळ्या ढगांपलीकडे
भकास डोंगरापलीकडे
असेल माझे स्वप्नांचे गाव
एकल्या वाळवंटात
शांत सरितेच्या प्रवाहात
मला अजून वाटते,
उगवेल नवचैतन्याची पहाट
मला अजून वाटते,
असेल उद्या माझा
उद्याचा प्रकाश माझा
उद्याचा क्षण माझा ...
No comments:
Post a Comment