Monday, 2 January 2017

सौजन्याची ऐशीतैशी

     



      “सौजन्यतसा शीलतरसयुक्त  गुण . सर्वांशी पटकन समरस  होणारा हा गुण, तसा अहिंसक, अनउपद्रवी.  परंतु,  या सौजन्याचा अतिरेक झाला तर त्याच्या गैरफायदा घेणारी संधीसाधू माणस समाजात तत्पर असतात. अशावेळी समाजाला  कसं सामोरं जावं ? प्रतिक्रिया दिली नाही तर समाज "सौजन्याची ऐशीतैशी " केव्हा व कशी करेल हे समजेपर्यंत बराच उपद्रव झालेला असेल .  

   कथानकाचा परीघ छोटा असला तरी ,  भरत जाधव याच्या अभिनयाने,  परिघाबाहेर अवघ संभागृह ताब्यात घेतलंय .  संहितेला सशक्त  बळकटी आणलीय.  मूळ नाटकात काळाप्रमाणे बदल केले आहेत . आजच्या काळात त्याच स्वरुपात स्वीकारण आजच्या पीढीला कठीण  गेल असत.  त्यामुळे नाटकात काळाचे बदललेले संदर्भ सुसंगत वाटतात. 

   मनुष्याला आपल अस्तित्व सिध्द करण्याची धडपड असते.  ज्यांच्याकडे कला, सर्जनशीलता , बुध्दी आहे त्यांच अस्तित्व समाजात आपोआप निर्माण होत.  सामान्य माणसाच काय?  माणसाला फक्त असण हे अस्तित्व मान्य नसते.त्याला ओळख हवी असते.  नानाला कल्पना आहे आपल्या मर्यादेची . त्याच्याकडे काही विशिष्ट कलागुण नसल्याची त्याला पुरेपूर जाणिव आहे . आपल्या अहंकारातून ते त्यांची ओळख निर्माण करु पाहतायत. 

   हे नाटक वसंत सबनीसांच्या मूळ संहितेवर आधारीत आहे.  'सौजन्याची ऐशीतैशी' करणार एक कुटुंब. नाना , नानी आणि त्यांची दोन मुलं .  त्यांचा फ्लॅट ताब्यात घेण्यासाठी टपलेले शेजारी, त्यातून निर्माण होणाऱ्या चकमकी.  शेजाऱ्यांवर सरशी करण्याकरीता सौजन्यांचा केलेला वापर , अस छोट कथानक आहे.  कथानक  काळाशी सुसंगत जोडण्यात आल आहे. त्यासाठी संगीताचा प्रभावी वापर करण्यात आला आहे .  विनोदाचे कारंजे उडत असले तरी भडक विनोदांचा डोस सौजन्याची ऐशीतैशीकरतो. 

   नानांचं  असंस्कृत वागण त्यांच्या मुळाशी येत असलेलं पाहून मित्रांच्या सल्ल्यानुसार ते सौजन्याची कास पकडतात.  मध्यंतरापर्यंत त्यांच्या   अघळपघळ वागण्यामुळे   सारखे संकटात सापडत असतात.  सौजन्याच्या वाटेने  ते कसा मार्ग काढतात.  त्यातून काय विनोद घडतात ?हे जरुर पहा.  एक निखळ मनोरंजन.  

No comments:

Post a Comment