Thursday, 5 January 2017

दीपस्तंभ







नाटकाचा आत्मा अनपेक्षित घटनांवर आधारलेला असतो.  नाटकाच्या नित्यक्रमात प्रेक्षकांना सुस्ती येऊ नये म्हणून , चतुर लेखक/दिग्दर्शक अनपेक्षित घटनांच चक्र फिरवू लागतो.  अशा चक्रातून जात असताना प्रेक्षक जास्त सर्तक होउुन नाटक पाहू लागतात. अनपेक्षित घटनांबाबत सर्वांनाच उत्सुकता असते . नाहीतर सामान्यांच्या नित्यक्रमात  असे कलाटणी देणारे बदल सहसा कुठे घडत असतात ? 


मानसी एक श्रीमंत ,एकाकी विधवा.  तिचा मुलगा बोर्डींगशाळेत मध्ये शिकत  आहे.  नाटकात जिचा उल्लेख येतो परंतु रंगमंचावर प्रत्यक्ष दिसत नाही,अशी तिची मैत्रीण प्रिन्सेस सोनिया , तिच्या वर्णनाप्रमाणे   तिच्यासारखी दिसणारी.   तसेच,  निशा जी प्रत्यक्ष रंगमंचावर दिसते,  अशा तिच्या दोन मैत्रिणी. मानसीचे काका सर्व कारभार पाहत असतात.  मानसी एकलकोंडी , भोळ्या स्वभावाची आहे.  निशा एक दिवस तिला एक कांदबरी वाचायला देते.  ज्यात तिच्या आयुष्यातले बारकावे सविस्तरपणे दिलेले असतात.  ती याचा जाब निशाला विचारते कारण तो लेखक निशाच्याच ऑफिसमधला असतो.  निशा सांगते,  तिने त्याला काही सांगितलेल नाही.  त्याच्या प्रतिभेने त्यान लिहिलय.  एक दिवस लेखक मानसीची माफी मागायला येतो.  मग दोघांची ओळख वाढते . मैत्रीच रुपांतर लग्नात होत.


          सर्व काही सुरळीत चालल असताना एकामागोमाग एक अनपेक्षीत घटना घडू लागतात.  एक दिवस लेखक तिला जाळून  जीवे मारण्याचा प्रयत्न करतो.  मानसी त्यातून वाचते . ती एका डॉक्टरला भेटते . ती जास्त बोलत नसल्याने डॉक्टर तिचे नाव अबोली ठेवतो . डॉक्टर तिच्यावर उपचार करून तिचा पूर्वीचा चेहरा मिळवून देतो . त्यानंतर  सुरु होतो एक धगधगता सूडाचा प्रवास. शांत मानसी स्वतःच स्वतःचा दीपस्तंभ होते .   शांत मानसी  सूडाग्नीने  पेटून उठलेली असते.  तिचे काका, डॉक्टर    तिला      सूडाग्नीच्या     ज्वालातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. आई ,अबोली, प्रिन्सेस सोनिया यातली तिची नेमकी ओळख तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत  असतात . त्यात ते यशस्वी होतात का?


          काळाचे संदर्भ बदललेले नसल्यामुळे  पूर्ण नाटकभर एक संथपणा जाणवत असला तरी , नाटकाची कथा  फिल्मी वाटावी अशी असल्यामुळे थोडी रंजक वाटते .   अशा प्रकारची  अनेक कथानकं यापूर्वी मोठ्या पडद्यावर सुध्दा येऊन गेली आहेत . नाटकाच्या मर्यादित परिघात अशा घटना उलगडून दाखवण खरच धाडसाच आहे.

No comments:

Post a Comment