स्पृहा जोशीं यांनी अलीकडे फेसबुकवर प्रसिध्द केलेल्या एका
फोटोवरुन नकारात्मक प्रतिक्रियांचा भडिमार होऊ लागला.जणू काही अगस्त्य मुनींसारखी त्या आपलीच निर्मिती
आहेत, या पुरुषी मानसिकतेतून. अगस्त्य मुनींना अभिप्रेत असलेल्या मानसिकतेतून “लोपामुद्रा” घडवायची असते. काळ बदलला तरी मानसिकता बदललेली नाही . समाजाला कायम त्यांना अभिप्रेत असलेलं समोरच्यात पाहायचं असतं . नाही त्यांचा दुराग्रहाचं असतो तसा .
“तुम्ही तुमची
इमेज आमच्या मनात पूर्णपणे बदलून टाकली” "त्या आमच्यासाठी
भावनांचा साद घालणारी सुंदर कविता होती.
भावना भडकवणारा कमनीय देह कधीच नव्हता.” अश्या मानसिकतेतून , वर्चस्वातून, पिढ्यानपिढ्याच्या च्या संक्रमणातून जोपासलेल्या प्रतिक्रियांचा, एकांगी विचारांचा अक्राळ -विक्राळ धबधबा समोरच्याच्या मनाचा , स्वातंत्र्याचा ,सन्मानाचा कोणताही आदर न करता कोसळू लागला. त्यांच्या सुंदर कवितांपेक्षा फोटोवर प्रतिक्रिया फार. त्यांच्या सुंदर कवितांतून जगणं सुंदर करण्यात , कुणालाही रस दिसून येत नाही .
लोकांच्या प्रतिक्रियांवरुन अस दिसत की, लोकांनी त्यांची मतं स्वत:हूनच निश्चित
केलेली आहेत. पुरुषी मानसिकतेतून. म्हणजे
दुसऱ्या व्यक्तीबद्दलचे जे मापदंड यांच्या मनात तयार झाले आहेत. त्याच स्वरुपात त्यांना पाहायचं आहे. समोरच्या व्यक्तीचं स्वतंत्र व्यक्तीत्व, परिघ
आहे, हे साईस्करपणे विसरुन. एकीकडे त्या
भावनांना साद घालणारी सुंदर कविता आहे असं म्हणायच तर केवळ समाजाच्या मनातील दुराग्रही इमेज जपली नाही म्हणून यांच्या मनातील इमेज बदलते, कारण
ती इमेज कशी असावी हे अगस्त्य मुनींसारखे यांनीच निश्चित केलं आहे.
आधुनिक
अगस्त्य मुनींना त्यांना कायम सात्विक, सालस स्वरुपात पाहायचं आहे, त्यांच्या स्वत:च्या अस्तित्वाला नाकारुन. जणूकाही त्यांनी पररुपाशी कायमची बांधिलकी स्वीकारली आहे , आपलं अस्तित्व नाकारून, समाजाला अभिप्रेत असलेलं . प्राचीन , अर्वाचीन काळ बदलाला तरी प्रत्येकाच्या वैयक्तीक स्वातंत्र्याचा आपण खुल्या मनाने स्वीकार केलेला नाही , ही कटू वस्तुस्थिती पुन्हा अधोरेखित होते .
त्यांच्या
कवितांनी तुम्हाला जगण्या पलीकडचे सुंदर जग दाखविले नाही काय? जगण्याचे गूढ अर्थ उकलताना जगण्यातील
सुंदरतेच्या अनुभूतीची जाणिव करुन दिली नाही काय? या कवयित्रीच्या संवेदनशील, बहुआयामी भावनातून जगण्याच्या सुंदरतेची प्रचिती तुम्हाला
आली नाही काय? भौतिकदृष्टया तुम्हालाच जसं पाहायच आहे तसं दिसत नाही म्हणून ? कवितेतून फुललेल्या , आकार घेतलेल्या त्यांच्या सुंदर भावविश्वाचा कसा विसर पडतो?
लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मतं मांडायचा अधिकार आहे. परंतु हा
अधिकार दुसऱ्याच्या अस्तित्वाची, स्वातंत्र्याची गळचेपी करणार नाही याच तर भान
निदान हवं. का पुरुषी मानसिकतेतून प्रत्येक गोष्ट आपल्यालाच ठरवायची आहे? अगस्त्य
मुनींसारखी. कोणी कस असावं , वागाव याचा अधिकार निदान त्यांना असू दे. त्याची जबाबदारी घेण्यास ते सक्षम आहेत . केवळ एका फोटोने मत कस बदलेल (मुळात मतं
बनविणारा मी कोण?)
त्यांच्या कवितांनी
जगण्याचं भान दिलय. जगण्यातील सुंदरता बघण्यास मदत केलीय. स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवलय, हे ऋण कसं
विसरता येईल?त्यांची कमी वयातील वैचारीक प्रगल्भता प्रभावित करत नाही काय ? भावना सुंदर असल्या की जग
सुंदर दिसत, भौतिक सौंदर्यापेक्षा वैचारिक सौंदर्याचा पगडा प्रभावित करत असल्यामुळे . यशाची शिखरे पादाक्रांत करत असताना कलाकारांचं केवळ झगमगीत रूप दिसतं . त्या तुलनेत त्यांना सामाजिक भावनांना कायम बांधलं जात . त्यांचं स्वातंत्र्य अव्हेरलं जातं . समाजाचे कटू विखारी घाव त्यांनी यापूर्वीच आपल्या कवितेतून व्यक्त केले आहेत आणि उदात्त मनाने ते विसरून जगण्यातील सुंदरता टिपण्यास , त्याचा आस्वाद घेण्यास त्या व्यग्र आहेत .
कटू विखारी घाव जगाचे
मनात येता विरुनी जावे
जगणे व्हावे इतके सुंदर
वेदनेतही गीत सुचावे .
कटू विखारी घाव जगाचे
मनात येता विरुनी जावे
जगणे व्हावे इतके सुंदर
वेदनेतही गीत सुचावे .
No comments:
Post a Comment