1) तू येणार नाहीस
हे माहित होत, काय करू
आसवानांच सरीसोबत
भिजायचं होतं
2) उधळून झाले सारे
आयुष्य रिते झाले
मला काय ठावे
उरतील फक्त चंद्र -तारे
३) तुझ्या डोळ्यात रमताना
दुनियादारी विसरून गेलो
हात हातातून केव्हा निसटला
तुला न समजता , विसरून गेलो
४) तुझ्या शब्दांना
गृहीत धरताना
स्पर्श निसटता
सांडून गेलो
५) असे काय घडले
सूर का बिघडले
आसवांनाही रडणे
जमलेच नाही
६) जमणारच नव्हती
प्रीत तुला तर
का जाळलेस
मायावी विभ्रमात
७) स्वप्ने फक्त
माझीच होती
का होतील वेदना
तुला ती तोडताना
८) झाल्या का ग वेदना
स्वप्न माझी तोडताना
कस जमत तुला
विसरून जा म्हणताना
९) तुझं आपलं बर आहे
मनातलं स्पष्ट बोलते
माझं ऐकण्या अगोदरच
क्षणात परकं करते .
१०) तू सोबत असताना
शब्द आड आले नाहीत
आता फार अवघड होत ग
शब्दांना आणि मलाही
११) मला हे सांगायचं होतं
केविलवाणं वाटलं तरीही
तू तर संधीही दिली नाहीस
म्हणून मन रित करायचं होत
१२) आयुष्य छोटं असतं
मला काय माहित नाही ?
तुझ्यासोबत वाटायचं ते मोठं
मोहक ,सुंदर, धुंद इतकचं
१३) तू म्हणशील ग आता
डीपी माझा वाचू नको
तुटतील पाश सारे ?
काळजी तू करू नको
१४) जिद्द असती तर
तू सोबत असतीस
प्रेम आहे म्हणून ...
कोणतेही बंध नाहीत
No comments:
Post a Comment