प्रत्येक पालकाची इच्छा असते, मुलाने खूप शिकाव. या शिकाव संज्ञेत मात्र पारंपारीक विद्याशाखांपलीकडे जास्त काही नसतं. उदा.डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी नोकरी इ. शिक्षणाची व्याप्ती अमर्याद आहे हे, एकरेषीय जीवनपध्दतीमुळे त्यांच्या लेखीही नसतं. एका मर्यादित परिघात काम करण्याच्या सवयीमुळे जगात त्या पलीकडे काही आहे. याचा त्यांना पुसटसा देखील अंदाज नसतो. अगदी शास्त्रज्ञ, सिइओ होणं प्रत्येकाला शक्य नसलं तरीही कितीतरी क्षेत्र खुली आहेतच. चित्रकला, संगीतकला, हस्तकला, लेखन, नृत्य कितीतरी . संधी आपल्या अवतीभवतीच असतात . त्यासाठी परंपरागत समजांचा , माहितीचा, अपेक्षांचा बुरखा दूर कारणं आवश्यक आहे . उदाहरणादाखल खालील प्रसंग पहा .
घटना -१ एक मुलगी गली 8 वर्ष नृत्याचे प्रशिक्षण घेतेय. तिच्या पालकांना सर्वसामान्य पालकांप्रमाणे तिने पदवी प्राप्त करावी अन् कुठेतरी चिटकाव अशी अपेक्षा आहे .सल्लागाराने सुवर्णमध्य साधत नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम सुचविला. जेणेकरुन पदवी, नृत्यकला दोन्ही प्राप्त झाल असत . त्यांचं उत्तर आल हे आपल काम नाही.
घटना -२ मुलाला दहावीत कमी गुण मिळाले होते. आग्रह होता इंजिनिअरिंगचा. सल्लागाराने स्पष्टपणे नाही
सांगितल. त्याच्या आवडीच्या आणि कुवतीच्या अभ्यासक्रमाला प्राधान्य द्या अस सांगितल. तरीही अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यात आला . परिणाम व्हायचा तोच झाला .मुलाला अभ्यासक्रम झेपेनासा झाला . वर्ष वाया .
एका
उदाहरणात मुलीकडे क्षमता असूनही पालकांच्या उदासीनतेमुळे, अज्ञानामुळे चांगली संधी
गमावली गेली तर , दुसरीकडे मुलाकडे क्षमता नसतानाही अवास्तव अपेक्षा बाळगल्या
गेल्या.
निसर्गाने
प्रत्येकांत काही विशेष पेरल आहे. ते
ओळखण्याची विकसीत करण्याची क्षमता मात्र हवी. नसेल तर तज्ञांचे मार्गदर्शन घ्या . काही मुलं कोणतीही भाषा पटकन आत्मसात
करतात. आज जगात वेगवेगळया भाषा बोलल्या जात असल्यामुळे भाषातज्ञांची नेहमीच
निकडं असते. परंतु पालक केवळ पदवीला अवास्तव महत्व देत असल्यामुळे अनेकांच्या दृष्टीने किरकोळ वाटणाऱ्या या भाषांच्या अभ्यासक्रमाचे
मोल प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावरच कळू लागते. पदवी हा तुमचा एकमेव निकष असेल तर , आज असे अनेक अभ्यासक्रम पदवी स्तरावर
उपलब्ध आहेत.
बुद्धिमत्ता ही बहुआयामी असते . केवळ काही निकषांच्या आधारे त्याची व्याख्या करता येणार नाही . एखाद्याला गणित येत नाही म्हणून त्याची बुद्धिमत्ता कमी होत नाही . कदाचित त्याला संगीत , चित्रकला यातील आकलन उच्च दर्जाचं असू शकेल . तूमच्या मुलात सॉफ्टवेअरचे स्किल असू शकते.सॉफ्टवेअरची सर्व जगात भाषा एकच आहे. मात्र काहीच गूगल, फेसबुक विकसित करण्यास सक्षम असतात, त्या क्षमतेचे स्किल असू शकेल . इतिहास , भूगोल अशा विषयांना तुलनेने कमी लेखलं जात . या क्षेत्रातही संधी आहेत याचा सखोल अभ्यास केल्यावर लक्षात येईल .

तुमच्या मुलांच्या क्षमतांकडे लक्ष देणे फार महत्वाचे असते . कदाचित एखाध्या विशिष्ट क्षेत्रात त्याची आवड आणि क्षमता असू शकते . हे ओळखता आलं पाहिजे . तुमच्या एखाद्या विषयाबद्दल प्रश्न पडणे म्हणजे त्याच्या सजगतेचे , आवडीचे संकेत आहेत . ते वेळीच ओळखून त्याला प्रोत्साहन देणे महत्वाचे आहे . पालकांच्या डोक्यातून पदवी करुन नोकरीस चिटकण्याची कल्पना जोपर्यंत मोडीत निघणार नाही, जागतिकिकरणात उपलब्ध असलेल्या संधी आणि मुलाची क्षमता जोपर्यंत पालकांना ओळखता येणार नाहीत तोपर्यंत मुलांच्या करीअरचा गोंधळ सुरुच राहणार आहे.
शिक्षण हे फक्त बंदिस्त वास्तूत करावयाचे काम नाही . ते समाजातून येतं अन पुन्हा तेथेच झिरपत . शिक्षणाची ओळख पुस्तकाच्या चौकटीत होऊ शकणार नाही त्यासाठी चार भिंतीपलीकडील शिक्षणाची जोड हवी . ही जोड मिळते चिंतन , तर्कशुद्ध विचार , चिकाटी , उत्सुकता यातून . राजस्थानच्या एका छोट्या गावातील एक माहिती वाचली . त्या गावातील लोक जगाच्या दृष्टीने निरक्षर परंतु त्यांच्याकडे ज्या कला आहेत त्या तुम्हाला येणार नाहीत . ते एक ज्ञानचं आहे. ज्ञानाला भाषेच्या किंव्हा कसल्याही मर्यादा नसतात . ते सतत एकीकडून दुसरीकडे वाहत असत . ते थांबलं की डबकं तयार होत. आपल्या पूर्वजांनी त्यांचं ज्ञान लिखित स्वरूपात न ठेवल्यामुळे पुढच्या पिढ्यां त्या ज्ञानापासून वंचित राहिल्या . ते ज्ञान त्यांना प्राप्त झालं असतं तर त्यात अधिक सुधारणा होत होत ज्ञान परिपूर्णतेकडे न्यायची सवय पुढच्या पिढ्यांना लागली असती. हा भूतकाळ झाला परंतु आता इंटरनेटच्या माध्यमातून अनेक विषय जतन झालेले आहेत . ते सर्वांसाठी खुले आहेत . निदान त्याचा योग्य वापर करून भविष्य घडिवण्यासाठी अमर्याद संधी तुमच्या समोर उभ्या आहेत .
हे विश्वच इतकं अमर्याद आहे की , सर्व गोष्टी तुम्ही एकाच वेळी शिकू शकणार नाही . तुमच्या मुलाची आवड तीव्र आंतरिक ओढीतून असेल तर वेगळया क्षेत्राकडे वळण्याचा मार्ग सुकर होईल. खूप गुण मिळविले म्हणजे हुषार, या संकल्पना आता कालबाह्य झाल्या आहेत. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात तुमच प्राविण्य किती आहे. यावरुन तुमचे व्यावसायिक मार्ग सुकर होतात. कदाचित तुमच्याकडे पुस्तकी परीक्षेत गुण मिळविण्याची क्षमता नसेल परंतु चित्रकला किंवा अन्य विषयात उच्च दर्जाची सर्जनशीलता असू शकते. आज आपण ऐकत असतो, एखाद चित्र कोटयावधींना विकल गेल.पैशात आणि पगारातच मोजायच तर विचार करा पदवीधर मुलाचा पगार महिन्याला जास्तीत जास्त 50000/- असू शकतो. म्हणजे वर्षाला 6 लाख. त्याला कोटी रुपये मिळवायला किती वर्षे लागतील याचा विचार करा. प्रश्न फक्त पैशाचा नाही, परंतु असं उदाहरण सहज समजू शकत म्हणून दिल.
आज उपग्रह सोडण्याचं तंत्रज्ञान सर्वसाधारण गोष्ट आहे . परंतु भारतीय शास्रज्ञनी एकाच वेळी १०४ उपग्रह सोडणे हे वैशिट्यपूर्ण आहे. सर्वांना मिळालेले शिक्षण सारखेच आहे . त्यांनी अनुभवातून विकसित केलेला दृष्टीकोन इथे महत्वाचा ठरतो . म्हणजे शिक्षण हे अनुभवातून विकसित होत असते . त्याकरिता झोकून पाठपुरावा करणे आवश्यक असते . केवळ पुस्तकी शिक्षण उपयोगाचे नाही त्याला वैशिट्यपूर्ण करणं , विकसित करण या गोष्टींनी त्याला परिपूर्णता प्राप्त होत असते . अशी गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी खूपच केंद्रित असलं पाहिजे . कामाचं वेगळेपण निर्मितीतून दिसून आलं पाहिजे . तुम्ही करत असलेल्या कामाची तुम्हाला आवड असेल ते काम म्हणजे जीवन वाटत असेल तर यश तुमच्या पाठी धावेल, हे सांगायच आहे.
या संदर्भात आइनस्टाईन या थोर शास्त्रज्ञाचे शिक्षणावरील विचार खूप महत्वाचे आहेत .
Education is what remains after one has forgotten what one has learned in school .
Education is not learning facts , but the training of the mind to think.
त्यांना एकदा सभेत एका व्यक्तीने एक गणिती सूत्र विचारले . त्यांनी सांगितले, मला नाही माहित . त्यावर ती व्यक्ती म्हणाली तुम्ही एवढ़े मोठे गणिती , तुम्हाला हे साधे सूत्र माहित नाही . ते म्हणाले , सूत्र लक्षात ठेवून डोक्यात कचरा करण्याची आवश्यकता नाही . सुत्रांकरिता संदर्भ ग्रंथ आहेत. माझ्या मेंदूचा वापर मी जास्तीत जास्त तर्कशुद्ध विचार करण्यासाठी करतो . आपण आज पाहत आहोत . मुलं कशी पोपटपंची करत असतात . त्यांची विचार करण्याच्या क्षमतेला खतपाणीच मिळत नसल्यामुळे , जे पाठ केलंय त्या पलीकडे स्वतःहून काहीही विकसित करण्यात मुलं अक्षम ठरतात . मुलांना लहानपणापासूनच स्वतंत्रपणे विचार करण्याची , प्रश्न विचारण्याची सवय लावल्यास त्यांच्यात अपेक्षित परिपक्वता वृद्धिंगत होऊ शकते . गुरूंना, मोठ्यांना प्रश्न विचारण्याची सोय समाजात नसल्यामुळे मुलांची चौफेर बौद्धिक वाढ लहानपणीच खुंटली जाते . आपल्या शिक्षण पद्धतीत साधारणतः तीन भाषा लहानपणापासून शिकाव्या लागतात . मातृभाषा, राष्ट्रभाषा , इंग्लिश. मातृभाषेतून शिक्षण घेणे आकलनाच्या दृष्टीने महत्वाचे असले तरी आज कोणत्या भारतीय भाषेत जगातलं सर्व ज्ञान उपलब्ध आहे. (जस जर्मन , फ्रेंच , जपानी भाषेत उपलब्ध आहे तसं ) या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी किंव्हा इंग्रजीला असलेल्या जागतिक महत्त्वामुळे शेवटी इंग्रजीचाच पर्याय निवडला जातो . भाषा हे केवळ एक माध्यम आहे , ज्ञान कस अर्जित केलं जातं हे महत्वाचं आहे .
आज परदेशात शिक्षण घेण्याकडे पालकांचा ओढा जास्त आहे . शेजारचा बाळ्या जातो म्हणून आपला बंड्या गेलाच पाहिजे या मानसिकतेतून कोणताही प्राथमिक अभ्यास न करता अट्टाहास केला जातो . विषय समजून न घेता पाठांतराचं भूत आपल्या मानेवर असं बसलय की , विषय समजून घेण्याची क्षमता हरवून गेलीय . परदेशी शिक्षणपद्धती मुलांना आत्मनिर्भर बनविण्याचा दृष्टीने तयार करण्यात आली आहे . मुलाला काय येत नाही यापेक्षा काय येत यावर जास्त भर असतो . मुलाचं आकलन महत्वाचं असतं . संदर्भ पुस्तक वाचून मुलांनी स्वतः नोट्स तयार करणे या प्रकारची तयारी मुलांना करावी लागते . एखादा विषय आपण का घेतलाय , उद्देश काय , त्यातून नेमकं काय करायचं आहे याचा सविस्तर विचार मुलांना करावा लागतो , ज्यायोगे ती कुणाचाही विशेष आधार न घेता स्वयं विकासाकडे वाटचाल करू लागतात . परदेशी जाताना किंवा एकंदरीतच अभ्यास कसा केला पाहिजे याच सुंदर विवेचन डॉक्टर श्रीराम गीत यांच्या परदेशी शिक्षणातील भ्रम आणि वास्तव या पुस्तकात वाचायला मिळेल . अनेक अभ्यासक्रमांची , पर्यायांची माहिती पुस्तकात देण्यात आली आहे . पालकांनी जागतिकारणात होणारे बदल , तज्ञाचे मार्गदर्शन , वास्तवाला समोर जाण्याची तयारी ठेवल्यास मुलांच्या करिअर बद्दलचा गोंधळ कमी होऊ शकतो . मुलं याबद्दल स्वतःहून काही विचार करतील याबद्दल शंकाच वाटते कारण आपल्या शिक्षणपद्धतीत मुलांना स्वतःहून विचार करण्याची सवयच लावण्यात आलेली नसल्यामुळे पालकांनाच हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे .

No comments:
Post a Comment