Saturday, 1 April 2017

गलितगात्र

किती मुखवटे     केविलवाणे चढवायचे
किती रस्ते   काहिलीत उन्हाच्या शोधायचे
पावसाने झोडपूनही कोरडा कोरडा मी
तुझ्यासह येणाऱ्या गारव्याची सर त्याला कुठे

माझा त्रागा , समजून घे , भयाण एकांत
अलिकडे तुझं  नजरेआड करणं बोचायला लागलंय
शब्द तर सोन्यासारखे महाग झालेयत्
हा  एकमात्र  आधार गमावून गलितगात्र झालोय

अलिप्त  कातळावर तुझी प्रतीक्षा करतोय , उगीचंच
न्याहाळत्योय बिंदुमात्र हालचाली तळ्याकाठच्या उगीचंच   ..
खरतर खोलवर रुजलेली आस अस्वस्थ करतेय
तुला त्या बिंदूतून अवतरताना  पहायला ...

No comments:

Post a Comment