Wednesday, 26 April 2017

हुंदके

पावसात रडताना
पांघरुणाखाली हुंदके देताना
झिरपत असतो भयाण आक्रोश आतच

 या भावना उरतील आता
कोमजलेल्या   , कोरड्या
काळाच्या डोहात , अव्यक्त


तुम्ही याल केव्हातरी,
तुमचा स्वार्थ साधून कदाचित
किंवा उपरती होऊन

परंतु तेव्हा माझ्याकडे नसतील
भावनांचे उत्स्फूर्त कारंजे ,
शब्दांचे सहज बागडणे

असेल जगणे एक उपचार म्हणून
असेल जगणे मरता येत नाही म्हणून
खुरडणे यालाच जगणे म्हणायचे म्हणून






No comments:

Post a Comment