ज्या गावात लोक
छत्रीही वापरत नाहीत , अशा गावात पाण्याची काय दुरावस्था असेल याचा विचार करा. अस एक गाव
आहे, साताऱ्यातील माण तालुक्यातील साधारण साडे सहा हजार लोक वस्तीचे बिदाल हे गाव.
कायम अवर्षणग्रस्त. जिकडे नजर फिरवावी
तिथे कोरडी जमीन दूरवर पसरलेली आहे. वातावरणात एक भकासपणा भरुन राहीलेला परंतु अशा
वातावरणात चैतन्य आल आहे ते पाणी फाऊंडेशनच्या प्रोत्साहनामुळे. पाणी फाऊंडेशनने अशा
अवर्षण ग्रस्त गावांचा एक नियोजनबध्द आराखडा तयार केला आहे. त्या आराखड्यानुसार
पाणी जिरवण्यासाठी, वाचवण्यासाठी जमीनीच्या चारी बाजूने बंधारे घातले जात आहेत. सांडपाणीही
वाया जावू नये म्हणून बाजूला शोष खड्डे तयार करुन पाणी वाचविले जात आहे. या कामासाठी
प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मेहनत चिकाटी या बरोबरच आर्थिक मदतीचीही गरज
आहे. परंतु या सर्वांची वाट न पहाता ग्रामस्थ एक जूटीने नंदवन फुलविण्यासाठी कामाला
लागले आहेत.
जवळ जवळ सात हजार एकराचा परिसर पिंजून काढायचा आहे. माण तालुक्यातील एकूण ३४ गावे पाणी फाऊंडेशनच्या
स्पर्धेसाठी उतरली आहेत. स्पर्धेचे नाव आहे, " सत्यमेव जयते पाणी कप" ही स्पर्धा वेगवेगळ्या
गावात घेतली जाईल. स्पर्धेचा निकष पाणी वाचविण्यासाठी कोणत्या गावाने जास्तीत जास्त
काम केले हा आहे. पहिल्या तीन गावाना 50 लाख, 30 लाख, 20 लाख रक्कम बक्षीस म्हणून
राहील. तसेच प्रत्येक तालुक्यातील एका गावाला 10 लाख इतकी रक्कम बक्षीस म्हणून
मिळेल. राज्यातील 30 तालुक्यांनी यात भाग घेतला आहे. या स्पर्धेचे निकष काय आहे याची
सर्व माहिती पाणी फाऊडेशनच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. पाणी फाऊंडेशनतर्फे गावातील
काही लोकांना पाणी व्यवस्थानाबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे . बिदाल गावातील ७ तरुणांनी
या बाबतचे प्रशिक्षण घेतले असून त्यांच्या पर्यवेक्षणाखाली व प्रशिक्षणाखाली सर्व ग्रामस्थ
मंडळी निर्धाराने कामाला लागली आहेत . वेडात दौडले शूर मराठे सात"" तसे बिदाल गावाचे हे मावळे झपाटले आहेत .
बिदाल गावतील लहांनापासून थोरांपर्यंत सर्व मंडळी सकाळी ६ वाजल्यापासुनच
कामाला लागतात. वैशिष्ट्य म्हणजे ज्यांच्या जमीनी नाहीत असेही लोक तितक्याच प्रेमाने
सहभागी झाले आहेत . या गावातील शेतकरी मूळातच मेहनती. पाण्याची टंचाई असताना डाळींब, स्ट्राबेरी , ड्रॅगनफ्रुट सारखी पीके घेण्याचे प्रयोग होत असतात. शासनाने ही योजना
राबवली असती तर त्याला कोट्यावधीचा खर्च आला असता. या शिवाय सर्व कामे विहित
मुदतीत झाली असती काय याचीही शाश्वती नव्हती. पाणी फाऊंडेशनने विशिष्ट मुदत दिली
असून लोकांना श्रमदानाने त्या मुदतीत काम पूर्ण करावायाचे आहे. जेव्हा सर्व लोक एकजूटीने
कामाला लागतात तेव्हा त्यांना शासनाच्या योजनेवर अवलंबून राहण्याची गरज नाही हेच
यातून सिध्द होईल .
दिनांक १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन व कामगार दिन. या दोन सुवर्ण योगाचा संयोग बिदाल येथे वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने घडून आला. श्रमदान संपल्यानंतर ग्रामपंचायत बिदालच्या सफाई कामगारांच्या हस्ते कामगार दिन साजरा केला गेला. तसेच श्रमदानासाठी आलेल्या प्राथमिक शाळा, महाविद्यालय, सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन करण्यात आले.
या गावाने महाराष्ट्राला अनेक गुणवंत विद्यार्थी, अधिकारी दिले आहेत .नैसर्गिक साधन -संपत्तीची वानवा असताना त्यांचं हे यश नेत्रदिपक आहे . चिकाटी , साधेपणा या गावाचा नैसर्गिक गुणधर्म आहे .ज्या गावाला अशा गुणी लोकांची परंपरा आहे त्या गावावर वरुणराजे आपल्या कृपेची नक्कीच बरसात करतील . याबद्दल शंकाच नाही .
दिनांक १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन व कामगार दिन. या दोन सुवर्ण योगाचा संयोग बिदाल येथे वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने घडून आला. श्रमदान संपल्यानंतर ग्रामपंचायत बिदालच्या सफाई कामगारांच्या हस्ते कामगार दिन साजरा केला गेला. तसेच श्रमदानासाठी आलेल्या प्राथमिक शाळा, महाविद्यालय, सरकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत झेंडा वंदन करण्यात आले.
साताऱ्याचे डॉ. पोळ यांची प्रेरणा
श्रमदानाच्या मागे आहे. डॉ. पोळ यांनी सकाळी जॉगींगला जाताना रोप लावण्याचा जो उपक्रम
सुरु केला त्याची फळ आता सातारवासीय चाखत आहेत. त्यांच्या कल्पनेतून पाणी वाचविणे,
मुरविणे या कार्याची महती सर्वांना पटली आहे. डॉ. पोळ हे पाणी फाऊंडेशन संस्थेवर
सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सुरु केलेल्या कार्याचा वणवा आता पेटला
आहे. परंतु हा वणवा सर्वांना हिरवागार करणारा असेल.
No comments:
Post a Comment