Monday, 8 May 2017

अमर फोटो स्टुडीयो

               


         एच.जी. वेल्स यांच्या टाईम मशिन या कथेत वर्तमान काळातून भूतकाळात जाण्याची कल्पना मांडण्यात आली आहे. या कथेत विज्ञानाचा आधार घेऊन कथा वास्तववादी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर आईनस्टाईन च्या साक्षेपता सिध्दांताने काळाबद्दल विज्ञानाच्या दृष्टीकोनातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु सदर सिध्दांत बराच किचकट आहे.

            काळ या संकल्पनेचा आधार घेऊन आतापर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले आहेत. रंगमंचावर हा विषय घेऊन "अमर फोटो स्टुडीयो "हा कदाचित पहिला प्रयत्न असावा. काळाच्या जोडीला जनरेशन गॅपचा आधार घेऊन एक हलकी फुलकी कथा रंगवण्यात आली आहे. एक तरुण जोडप त्यांच्यातले गैरसमज, अपेक्षा  यातून कथा उलगडत थेट भुतकाळात जाते. अमर फोटो स्टुडीयोमधून त्यांना थेट भूतकाळात धाडण्यात येते. तिथे त्यांना एक मिशन पार करायचे असते. हे मिशन पार करुन ते वर्तमान काळात येतात की, भूतकाळाच्या लूपमध्ये अडकून बसतात, यासाठी हे नाटक पहावे लागेल.
.

No comments:

Post a Comment