Tuesday, 16 May 2017

किती तरी ......

किती तरी सांगायचं राहून गेलं
सांगता सांगता हृदयात रुतून गेलं

तुझ्यासवे विहरण्याचे स्वप्न जुनेच
तुझ्याविना ते कोमेजून गेलं

तुझ्या  शब्दांच्या गोड मैफिलीत
तुझ्यासवे जागण्याचे राहून गेलं

राहून गेले  क्षण मोहरलेले
कित्येक क्षण जगण्याचे,

जगणे म्हणजे तू हे कळेपर्यंत
जगणे पुरतं  सांडून गेलं

No comments:

Post a Comment