अधर्माने केला खुळा
भक्तीचा उपसून डोंगर,
मनाने झाला पांगळा
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
मानवता पडली कोनाड्यात
शोधसी तू का भंडारा,
जगावेगळा अगम्य आसरा
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
विज्ञानाने दिली सिद्धता
त्याचा विचार कधी का केला?
मानव धर्म कधी जाणला?
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
फक्त श्रद्धा तुझे उत्तर
मग जपून ती ठेव
का त्रास दुसऱ्याला
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
संतवचन म्हणे देव माणसात
तुज कसा नाही दिसला
का कर्मकांडात तू फसला
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
भक्तीचा उपसून डोंगर,
मनाने झाला पांगळा
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
मानवता पडली कोनाड्यात
शोधसी तू का भंडारा,
जगावेगळा अगम्य आसरा
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
विज्ञानाने दिली सिद्धता
त्याचा विचार कधी का केला?
मानव धर्म कधी जाणला?
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
फक्त श्रद्धा तुझे उत्तर
मग जपून ती ठेव
का त्रास दुसऱ्याला
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
संतवचन म्हणे देव माणसात
तुज कसा नाही दिसला
का कर्मकांडात तू फसला
करुनी मर्कट लीला
झालाय तुझा खुळखुळा
No comments:
Post a Comment