प्रवास हा जीवघेणा
तरी आस मालवेना
कधी आकाशी भरारी
कधी धरतीशी यारी ,
कधी धुंद आनंद ,
कधी अंतरी वेदना
कधी पायवाट मोकळी
कधी सामोऱ्या आडवाटा
एक एक क्षणमात्र
मृगजळ जरी हे
काय वेगळे जग हे पहाण्या
दुसऱ्या परिघात विसावणारा
या बिंदूतून त्या बिंदूत ,
त्याच टप्प्यावर स्थिरावणारा
प्रवास हा जीवघेणा
तरी आस मालवेना
No comments:
Post a Comment