Monday, 19 June 2017

आयुष्य जगण्याचे डॉक्टर कलाम यांचे नियम



१)  आयुष्य खडतर आहे , त्याची सवय करून घ्या .

)  जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही . स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा . स्वतःला सिद्ध करा .

३)  कॉलेजमधून बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करू नका . एका रात्रीत कोणी वाईस प्रेसिडेंट होत नाही , त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .

४)   आज कदाचित तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भीतीदायक वाटत असतील , कारण अजून बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय .

५)   तुम्ही केलेली चूक ही सर्वस्वी तुमची चूक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे . कोणाला दोष देऊ देऊ नका . झालेल्या चुकिपासून धडा घ्या आणि पुढे चालत रहा
.
६)  तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेव्हढे तुम्हाला ते आता वाटतात . तुमचेच संगोपन करण्यासाठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे .

७)  उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पाहायला मिळतो . काही शाळांमध्ये तर अगदी पास होईपर्यंत परीक्षा देता येते . बाहेरच्या जगातील पद्धत मात्र वेगळीच असते . खऱ्या जगात हरणाऱ्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो .

८)  आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते , त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते , स्वतःचा शोध घ्यायला , नवीन काही शिकायला कोणी तुम्हाला वेळ देत नाही . तो वेळ तुम्हालाच शोधायचा असतो .

९)  टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सिरीयल नसते . खऱ्या आयुष्यात अराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम .

१०)  स्वप्न ते नाही जे तुम्ही रात्री झोपेत बघतात , स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही . 

No comments:

Post a Comment