Friday, 23 June 2017

देव कुठे आहे ?

चित्रातल्या देवाला बघून
 आसवे गाळणारा
माणसांच्या वेदनेने
भावनावश  का होत नाही ? 

दगडाच्या मूर्तीला
गोंजारणारा हात 
माणसांच्या जखमेला
स्पर्श का करत नाही ?

वारीत सदा रमणारा 
आपलं कर्म विसरणारा
दीन माणसांच्या मैफिलीत
देव का शोधत नाही  ?

स्वतः कर्म करून
व्यवहारी बोध देणाऱ्या
डेबुचे स्मरण न करता
उपदेशी बुवांच्या,जत्रेत   रमतात

तेव्हा कळेनासे होते
देव कुठे  आहे ?
संतांनी सांगितलेल्या माणसांत
का टाळ -टिपऱ्यांच्या गजरात ?





No comments:

Post a Comment