Wednesday, 28 June 2017

मृगजळ

कधी गडद अंधार
कधी कोवळी पहाट

कधी सुख डोकावे
 इंद्रधनूच्या रूपात

कधी सागराचे थैमान
कधी सरितेचे भान

कधी पांढऱ्या नभावर
दाटे काळी किनार

गुंफण्या अधीर मन
सुख दुःखाची माळ

 क्षण मृगजळ जरी
उगवेल सोनेरी काळ


No comments:

Post a Comment