Thursday, 10 August 2017

माझेच मला न उमगे

हा क्षण माझा ,  तो क्षण माझा
अनंत मोहांचा  सागर

कितीही वेचले बिंदू
तरी तहानले मन

किती विहारावे  आकाशी
पंख गेले थकून

किती उरावे अंतरी
परि जाणीव क्षणभंगुर

माझेच मला न ठावे
या दिशा,  हे अंतर

माझेच मला न उमगे
सुप्त जाणिवांचे खेळ ......


No comments:

Post a Comment