मनावर ओरखडे उमटवायला
मला आवडतंच असं नाही
हतबल झालेयेत शब्दही
आकार द्यायला जमतच असं नाही
तुम्ही असता कोषाला उबगून ,
थोडावेळ माझ्यासाठी उपचार म्हणून
मला निरंतर साथ द्यावी
असा माझा आग्रहही नाही
मनाचा मनाशी मेळ नाही
मन जपायला जमतच असं नाही
तुमच्या शिवाय पोकळी जाणवेल
इतकं नातं घट्टही नाही
शोधतोय नात्यात झऱ्यासारखी नितळता
माझा एकटेपणाला आक्षेपही नाही
तुम्ही खूशाल म्हणा स्वार्थी मला
निःस्वार्थ नाते मी कधी पाहिलेही नाही
तुम्ही जगा तुमच्या कोषात
मला माझ्या परिघाचा खेद नाही
मनात उमटतात दिशाहिन आवर्तने
मृत्युइतकी, दिशा निश्चितही नाही
तुमचे मज काय देणे आहे
चितेवर आसवे ढाळावीत असा
माझा आग्रहही नाही
मला आवडतंच असं नाही
हतबल झालेयेत शब्दही
आकार द्यायला जमतच असं नाही
तुम्ही असता कोषाला उबगून ,
थोडावेळ माझ्यासाठी उपचार म्हणून
मला निरंतर साथ द्यावी
असा माझा आग्रहही नाही
मनाचा मनाशी मेळ नाही
मन जपायला जमतच असं नाही
तुमच्या शिवाय पोकळी जाणवेल
इतकं नातं घट्टही नाही
माझा एकटेपणाला आक्षेपही नाही
तुम्ही खूशाल म्हणा स्वार्थी मला
निःस्वार्थ नाते मी कधी पाहिलेही नाही
तुम्ही जगा तुमच्या कोषात
मला माझ्या परिघाचा खेद नाही
मनात उमटतात दिशाहिन आवर्तने
मृत्युइतकी, दिशा निश्चितही नाही
तुमचे मज काय देणे आहे
चितेवर आसवे ढाळावीत असा
माझा आग्रहही नाही
No comments:
Post a Comment